पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : अंतुर्ली खुर्द येथील पाटील कुटुंबाच्या मालकीच्या आजपासून ग्राहकांच्या सेवेत रूजू झालेल्या बळीराजा कृषी केंद्राचे उदघाटन झाल्यावर वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या.
अंतुर्ली खुर्द येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज बळीराजा कृषी केंद्राच्या उदघाटनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह बाजार समिती सभापती गणेश भीमराव पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. बळीराजा कृषी केंद्राचे उदघाटन झाल्यानंतर वैशालीताई सुर्यवंशी यांनी पाटील कुटुंबाला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शरद पाटील, दादाभाऊ चौधरी, ॲड. अभय पाटील, दत्तू अहिरे, अनिल सावंत, एकनाथ महाजन, संदीप जैन, शशिकांत बोरसे, संतोष पाटील, मिथून वाघ, हरीष देवरे, मनोज चौधरी, डी.डी.नाना, संजय चौधरी, किरण पाटील, अरूण तांबे, धर्मसिंग पाटील, बळीराजा कृषी केंद्राचे संचालक बाबाजी वीरभान पाटील, साहेबराव वीरभान पाटील, गंभीरराव वीरभान पाटील, अनंत साहेबराव पाटील, मुकेश बाबाजी पाटील, सागर गंभीरराव पाटील व हेमंत गंभीरराव पाटील आदींची उपस्थिती होती.
