मुंबई | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आज Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स साइट्सवर बाजारात दररोज एक नव नवीन स्मार्टफोन लॉन्च होत असतात. तसेच या साईट्सवर ग्राहकांना स्वस्त दरात स्मार्टफोन उपलब्ध करून दिले जातात. आता भारतीय स्पर्धा आयोग म्हणजेच CCI च्या तपासणी अहवालात याबाबतचा मोठा खुलासा झाला आहे.
सीसीआयच्या या तपासणी अहवालात ई-कॉमर्स साइट ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले आहे. लवकरच CCI कडून हा तपासणी अहवालावर सर्व पक्षीय चर्चा केली जाणार आहे. जर या कंपन्या दोषी आढळल्या तर कंपन्यांना मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो.
Amazon आणि Flipkart कडून नियमांचे उल्लंघन
एका वृत्तवाहीनीच्या रिपोर्टनुसार, CCI ने या प्रकरणाची DG चौकशी केली असता हा खुलासा झाला. आता CCI कडून या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्व पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी देणार आहे. तपासात कंपन्या दोषी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. सीसीआय जानेवारी २०२० मध्ये या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. या कंपन्यांबाबत मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने सीसीआयकडे तक्रार केली होती. त्यात या ऑनलाईन कंपन्यांवर स्पर्धा संपवल्याचा आरोप करण्यात आला होता. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, कंपन्या मोबाईल फोनवर मोठ्या प्रमाणात सूट देत होत्या आणि निवडक विक्रेत्यांनाच विक्री करण्याची संधी देत असल्याचा आरोप करण्यात आला होता.