Headlines
Home » जळगाव » महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पोलीस स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, दि.१७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:४५ ते दुपारी ३:३० वाजेपर्यंत शहरातील पोलीस स्केटिंग ग्राऊंड, पोलीस मुख्यालय, नवीन बस स्टॅन्ड समोर, जळगाव येथे शस्त्र, श्वानपथक, पोलीस बँड, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वायरलेस यंत्रणा यांचे प्रदर्शन जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

सदर प्रदर्शनीचे उद्घाटन पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते होणार आहे. नागरिक तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सदर प्रदर्शनाला भेट देऊन पोलीस हाताळत असलेले यंत्र व शस्त्रांविषयी माहिती जाणून ध्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. सदर उपक्रम मागील ९ वर्षांपासून नागरिकांसाठी आयोजित करण्यात येते. हे आयोजनाचे १० वे वर्ष आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!