जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहेत. देश विकासासाठी मतदानाचे कर्तव्य प्रत्येकाने बजावले पाहिजे. संविधानाने मतदानाचा अधिकार देशातील प्रत्येक नागरिकाला दिला आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी शासनाचे मतदान जनजागृती अभियान उपयुक्त आहे. सशक्त व लोकशाहीचा हा उत्सव प्रत्यक्ष मतदान करून साजरा करूया असे आवाहन के.सी.ई. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी केले.
मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत त्या संदर्भात मतदान जनजागृती व त्या संबधीची शपथ शासन नियुक्त मदन लाठी (सहकारी गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जिल्हा आयकॉन ऑफ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्वीप अंतर्गत जळगाव) यांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देऊन जनजागृती केली.
यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.