पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा तालुक्यातील श्री क्षेत्र आडगाव, वानेगाव, निंभोरी, बनोटी गावातील वारकरी श्री संत माहुजी महाराज संस्थानच्या वतीने वाडी शेवाळे ते तीर्थक्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीचे काल सायंकाळी पाचोरा येथे आगमन झाले.
यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी उपस्थित राहून वारकरी मायबापांशी संवाद साधत कीर्तनाच्या सुरात विठुरायाच्या नामस्मरणाचा अनुभव घेत, वारकरींचा आशीर्वाद घेऊन वारीसाठी शुभेच्छा दिल्या.
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडी उच्चारा।।
विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल।।