Headlines
Home » सांस्कृतिक » वैशालीताई सुर्यवंशी यांची अनोखी वटपौर्णिमा ;मतदारसंघात वटवृक्षांचे वाटप व रोपण करून पूजन

वैशालीताई सुर्यवंशी यांची अनोखी वटपौर्णिमा ;मतदारसंघात वटवृक्षांचे वाटप व रोपण करून पूजन

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारतीय संस्कृतीतील पती-पत्नीच्या नात्यातील विलोभनीय भावबंध असलेल्या वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी पर्यावरणपूरक अशा वृक्षारोपणाच्या चळवळीला गती देत वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी नाविन्यपूर्ण पध्दतीत वटपौर्णिमा साजरी केली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, ज्येष्ठ पौर्णिमा ही भारतीय संस्कृतीत वटसावित्री पौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. या सणातील प्रमुख घटक म्हणजे वटवृक्ष होय. आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी सावित्रीने थेट यमराजाशी संघर्ष केला होता. म्हणून दरवर्षी हा उत्सव साजरा होतो. यात वटवृक्षाचे पूजन करण्यात येते. दरम्यान, वटसावित्री पौर्णिमा ही पर्यावरण पूरक पध्दतीत साजरी करण्यात यावी या हेतूने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला.

या उपक्रमाच्या अंतर्गत वैशालीताई सुर्यवंशी यांच्या वतीने पाचोरा-भडगाव मतदारसंघातील प्रत्येक गावात सुमारे तीन ते चार वटवृक्षांचे वाटप करून याचे रोपण करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!