Headlines
Home » सांस्कृतिक » महासंस्कृती महोत्सवात गुरुवारी पारंपारिक लोककला, शिवकालीन मर्दानी खेळ आणि आयुष्यावर बोलू काही

महासंस्कृती महोत्सवात गुरुवारी पारंपारिक लोककला, शिवकालीन मर्दानी खेळ आणि आयुष्यावर बोलू काही

जळगाव | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि.२८ फेब्रुवारी ते ०३ मार्च पर्यंत महासांस्कृतिक महोत्सव महोत्सव पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आले असून गुरुवार दि.२९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पारंपारिक कला, शिवकालीन मर्दानी खेळ, लोकनाट्य, स्वातंत्र्य लढ्वय्यांची ची गाथा आणि शेवटी “आयुष्यावर बोलू काही” हा कार्यक्रम होईल.

पारंपरिक लोक कला, नृत्य सादरकर्ते – प्रवीण वसंतराव पाटील व सहकारी सादर करतील, त्यानंतर शिवकालीन मर्दानी खेळ सादरकर्ते – युवराज माळी आणि इतर, रावेर जि. जळगाव, याशिवाय किंगरी हे लोकनाटय होणार असून स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची गाथा श्री. भिका काशिनाथ भराडी, दलवाडे गोंडगाव ता. भडगाव हे सादर करणार आहेत. संध्याकाळी ०७:३० वाजता महाराष्ट्रातील गाजलेला कार्यक्रम डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा “आयुष्यावर बोलू काही ” हा कार्यक्रम होणार आहे. जळगावकरांनी मोठ्या संख्येनी कार्यक्रमाला यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!