जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर जळगाव ज्युनिअर बालवाडी वर्गाची हिवाळी सहल दि.१६ सोमवार रोजी पाळधी गणपती मंदिर, साईबाबा मंदिर, अमळनेर नवग्रह मंदिर, कपिलेश्वर येथे नेण्यात आली. तसेच दि.१७ मंगळवार रोजी नर्सरी वर्गाची सहल पाळधीचे गणपती मंदिर व साईबाबा मंदिर येथे नेण्यात आली. दि १८ रोजी सीनियर बालवाडी वर्गाची सहल मनुदेवी माता आडगाव व अवचित हनुमान या ठिकाणी नेण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी सहलीचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी विद्यार्थ्यांना संस्थेकडून खाऊ व पावभाजीचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिक अर्चना नेमाडे व सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सहल आनंदात पार पडली.