Home » क्रीडा » टी-20 क्रिकेट : भारत आणि दक्षिण अफ्रीका यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात

टी-20 क्रिकेट : भारत आणि दक्षिण अफ्रीका यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आंततरराष्ट्रीय टी 20 वर्ल्ड कप २०२४ च्या अंतिम सामन्यात पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेला किंग्समीड, डरबन येथे आजपासुन सुरवात होत आहे. सूर्यकुमार यादव या मालिकेत टीम इंडियाचे तर एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. अतिशय कडवी झुंझ या मालिकेत बघायला मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सामन्याला सुरवात होईल.

टी20 सामन्यात भारताकडून युझवेंद्र चहल याने टीम इंडियासाठी टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८० सामन्यात सर्वाधिक ९६ विकेट्स घेतल्या आहेत. तर आता हार्दिक आणि अर्शदीप या दोघांकडे चहलला मागे टाकण्याची बरोबरीची संधी आहे. त्यामुळे आता या मालिकेतील चहल चा विक्रम मोडण्यासाठी या दोघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.

सध्या दुसऱ्या स्थानावर भुवनेश्वर कुमार आहे. भुवीने ८७ सामन्यांमध्ये ९० फलंदाजांना बाद केले आहे. तिसऱ्या स्थानावर जसप्रीत बुमराह असून त्याने ७० सामन्यांमध्ये ८९ विकेट्स घेतल्या आहेत. तर चौथ्या आणि पाचव्या स्थानी अनुक्रमे अर्शदीप सिंह आणि हार्दिक पंड्या आहेत. दोघांच्या नावावर प्रत्येकी ८७ विकेट्स आहेत. मात्र अर्शदीपने हार्दिकच्या तुलनेत वरचढ आहे. हार्दिकने १०५ तर अर्शदीपने केवळ ५६ सामन्यांमध्ये ८७ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!