Home » जळगाव » झांबरे विद्यालयात आयसीटी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी केले पी.पी.टी प्रेझेंटेशन

झांबरे विद्यालयात आयसीटी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी केले पी.पी.टी प्रेझेंटेशन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्यात समग्र शिक्षा उपक्रमाचे अंतर्गत प्रत्येक शाळेत संगणक शिक्षणासाठी प्रयोगशाळा आणि एक प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहे. आजच्या डिजिटल युगात टिकण्यासाठी संगणकासोबत मैत्री साधने आणि त्याचे शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे हाच उद्देश ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटी उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात संगणक प्रयोगशाळा तयार करण्यात आली असून या प्रयोगशाळेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे प्रशिक्षण दिले जाते. नुकताच इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पाठ्यपुस्तकातील विविध घटकांवर आधारित पी.पी.टी. प्रेझेंटेशन आय.सी.टी. प्रयोगशाळेत सादर केले.

यासाठी आय.सी.टी.च्या प्रशिक्षक स्मिता शेंडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनन्या मोरे, कार्तिकी पाटील, नूतन बारी मनस्वी महाजन, तेजल महाजन, लावण्या चौधरी, मनाली पाटील, कृष्णाली पाटील, कृष्णा वर्मा अर्णव केदार, रुद्र येवले, या विद्यार्थ्यांनी अत्यंत छान पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून आपले पी.पी.टी प्रेझेंटेशन सादर केले.

या प्रेझेंटेशनचे परीक्षण शाळेचे ज्येष्ठ शिक्षक महेंद्र नेमाडे आणि संदेश करळकर यांनी केले. उत्कृष्ट पीपीटी प्रेझेंटेशन सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळेस बक्षीसे देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!