जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सिंधी पंचायत हॉलमध्ये प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. अंधांच्या ब्रेन लिपीचे जनक लुईस ब्रेन यांच्या जयंतीनिमित्त व दर्शन परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त अंधांच्या राज्यस्तरीय सुगम गित गायन स्पर्धत राज्यभरातून पुणे, मुंबई, अकोला, नागपूर, सोलापूर, अहमदाबाद इत्यादी ठिकाणाहून प्रज्ञाचक्षु बांधवांनी व भगिनींनी हजेरी लावली.
सर्वप्रथम सकाळी उद्घाटन समारंभात NAB चे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धकांचे, परीक्षकांचे व आलेल्या पाहुणे मंडळींचे स्वागत सत्कार करण्यात आले. त्यानंतर स्पर्धा घेण्यात आल्या. त्यासाठी परीक्षक म्हणून मोना टेलर व अभय कसबे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी प्रवीण महाजन व सुशील महाजन यांनी तबला व हार्मोनियमवर साथ केली.
स्पर्धेनंतर प्रथम तीन क्रमांक निवडण्यात आले व दोन क्रमांकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमात प्रथम क्रमांकाने समीक्षा माकोडे, द्वितीय ज्ञानेश्वर आहेरकर, तृतीय शिवचरण वडमोडे हे विजयी झालेत. तर उत्तेजनार्थ पारितोषिक योगिता गायकवाड व पूजा शेंडे यांना देण्यात आला.
यानिमित्त इनर व्हील क्लब ऑफ जळगाव यांच्या वतीने सर्व पारितोषिक प्राप्त स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. प्रथम पारितोषिक ५०००, द्वितीय ३००० रुपये, तृतीय २००० व उत्तेजनार्थ प्रत्येकी १००० रुपये याप्रमाणे पारितोषिके वाटप करण्यात आलीत. परीक्षकांना सुद्धा मानधन देण्यात आले.
पारितोषिक कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानी ए.के. नारखेडे होते. सर्व पारितोषिक प्राप्त स्पर्धकांना ए.के. नारखेडे, जळगाव सिंधी पंचायत चे अध्यक्ष सितादास जवाहरानी, राजेश जवाहरानी आणि इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन, दर्शन परिवाराचे संजय बडगुजर,अनिल शिंदे यांच्या शुभहस्ते पारितोषिके देण्यात आली. आमदार सुरेश भोळे, विशाल भोळे यांनी ही कार्यक्रमादरम्यान उपस्थिती होती. या कार्यक्रमात इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन, सचिव निशिता रंगलानी, सीसी रंजन शाह, संध्या महाजन, तनुजा मोरे, रोहिणी मोरे आदि सदस्य उपस्थित होते. NAB चे सदस्य, कार्यकारी मंडळ व सचिव सी.डी. पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिंधी पंचायत हॉलचे अध्यक्ष राजेश जवाहरानी यांनी हॉल उपलब्ध करून दिला. तसेच प्रज्ञाचक्षु बांधवांना व भगिनींना भोजन गं.भा. पद्माबाई काळे व त्यांचे बंधू नारायण खडके यांच्याकडून देण्यात आले. आदल्या रात्री चे भोजन जी आर चौधरी NAB चे सदस्य यांच्याकडून देण्यात आले. सकाळचा नाश्ता राजू साळुंखे यांनी दिला. तसेच दोन दिवस लागणारा चहा जय सर्जिकल चे जय भैय्या यांनी दिला. इनरव्हील क्लब तर्फे सर्व स्पर्धकांना केळी चिप्स वाटप केले गेले.
या सर्व यशस्वीतेसाठी नॅबचे सचिव सि डी पाटील, सभासद संजय खंबायत,सुनील चौधरी, राजेंद्र खोरखेडे, विजय गिरनारे, महेश महाजन, सरोदे, मोते यांनी कार्यक्रम यशस्वी केला. सुनील चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक सी.डी. पाटील यांनी केले. परीक्षक परिचय लता पाटील, श्रुती पाठक यांनी केले. संजय बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत गीत स्वर साधना संगित विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनि स्वरा बडगुजर, सानवि तायडे, निति दोशि , प्रतिष्ठा वर्मा यांनी सादर केले. ए.के. नारखेडे यांनि खान्देश गित गायले.