जळगाव ( वास्तव पोस्ट ) : व्यवसायिक कोर्स एम.बी.ए, बी.बी.ए., बी.सी.ए., बी.एम.एस. आणि एम.सी.ए. आणि एमसीए (इंटिग्रेटेड) च्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता राज्य सामाईक परिक्षांसाठी (सीईटी) ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली असून, आयएमआर मध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा निशुल्क उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सीईटी ची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सूचना जारी केलेली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना के.सी.ई. चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये संपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य केले जात आहे. बीबीए कोर्सबाबत मार्गदर्शनासाठी डॉ. अनुपमा चौधरी तसेच एमबीए साठी डॉ. पराग नारखेडे, एमसीए (इंटिग्रेटेड) दिपाली किरंगे, एमबीए फार्मा साठी डॉ. कविता पवार, एमसीए साठी उदय चतुर, बीसीए साठी श्वेता फेगडे तसेच इतर तज्ञ प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
एमबीए आणि एमबीए फार्मा तसेच एमसीए साठी आँनलाईन ॲप्लीकेशन फार्म, रजिस्ट्रेशन आणि त्याची पृष्टी करण्यासाठी २५ जानेवारी पर्यत मुदत आहे. तर बीबीए, बीसीए, एमसीए इंटिग्रेटेडचे आँनलाईन अँप्लीकेशन फार्म, रजिस्ट्रेशन आणि त्याची पुष्टी करण्यासाठी १० फेब्रुवारी पर्यत मुदत आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत केसीई आयएमआर चे नाव हे व्यवसायिक अभ्यासक्रमासंदर्भात कायम अग्रेसर असते. गेल्या ३८ वर्षात आयएमआर चे ३३ विद्यार्थी सर्वप्रथम येऊन सुवर्णपदक विजेते ठरले आहेत. या वर्षी देखील आयएमआर ची श्रृतीका बांगडी ही विद्यार्थिनी दोन सुवर्णपदक विजेती ठरली आहे.
तसेच अतिशय अद्ययावत डिजीटल क्लासरुम, अत्याधुनिक वाचनालय आणि रिडींग रूम, काॅम्पुटर लॅब यासह तज्ञ प्राध्यापक वर्ग असलेल्या, केसीई आयएमआर मध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमासदंर्भात विद्यार्थ्यांना करीयर काॅन्सिलींग केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयएमआर चे संचालक प्रा.डॉ. बी.व्ही. पवार यांनी केले आहे.