जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रोटरी जळगाव ईस्ट तर्फे ११ जुन रोजी सुरू झालेल्या शिबिराला शेकडो रुग्णांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सदर शिबिर १७ जुन पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात गुडघे दुखी, कंबर दुखी, मान दुखी, खांदे दुखी, सायटिका, ॲसिडीटी इत्यादी रोगांवर थेरेपीस्ट संदीप नायक उपचार करणार आहेत.
दरम्यान हे शिबिर जळगावातील कोर्ट चौकातील चोपडा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, १ ला माळा, कृषक भवन येथे होत आहे. नाव नोंदणी व उपचार साठी नाममात्र फी रुपये २००/- ठेवण्यात आली असून १७ तारखेपर्यंत एकदाच फी आकारली जाणार आहे. तरी रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी जळगाव ईस्ट चे अध्यक्ष संजय शहा, सचिव सुनील बैद, कमिटी चेअरमन डॉ. प्रशांत चोपडा, प्रकल्प प्रमुख डॉ. मनोज चौधरी, डॉ.जगमोहन छाबडा यांनी केले आहे.