Headlines
Home » जळगाव » एमएच-सीईटी व नीट साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स ; महावीर क्लासेसचा उपक्रम

एमएच-सीईटी व नीट साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स ; महावीर क्लासेसचा उपक्रम

स्पर्धा परीक्षाभिमुख तज्ञांकडून मार्गदर्शन

वास्तव पोस्ट l जळगाव : वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेशासाठी होणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर महावीर क्लासेसतर्फे केवळ एमएच-सीईटी (मेडिकल व इंजिनिअरिंग) विद्यार्थ्यांसाठी विशेष ४५ दिवसांचा उन्हाळी क्रॅश कोर्स १२ वी परीक्षेनंतर लगेच सूरु होणार आहे. विद्यार्थ्यांना अचूक व परीक्षाभिमुख मार्गदर्शन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

सीबीएसई व राज्य मंडळाच्या बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा या कोर्समध्ये सहभाग असून, सदर विशेष क्रॅश कोर्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी ( फार्मसी, नीट ) तसेच फिजिक्स, केमिस्ट्री व गणित ( इंजिनिअरिंग ) या विषयांचे सखोल अध्यापन करण्यात येणार असून मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून संभाव्य प्रश्नांचा सराव, महत्त्वाच्या प्रकरणांवर विशेष भर आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून संकल्पना स्पष्ट करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

विशेष क्रॅश कोर्सचे वैशिष्ट्ये

परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन सत्रांचे आयोजन देखील या विशेष क्रॅश कोर्स कालावधीत करण्यात आले आहे. प्रश्न सोडविण्याचा वेग त्यासाठी लागणारे वेळेचे अचूक नियोजन व अचूकता वाढविणे, तसेच नियमित सराव चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या शंकांचे त्वरित निरसन करून वैयक्तिक प्रगतीचा आढावा घेतला जाईल. तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक प्रवेश परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रकरणानुसार अचूक मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भिती कमी व्हावी यासाठी प्रकरणनिहाय त्रिस्तरीय परीक्षांचे आयोजन केले जाते. टप्प्याटप्प्याने परीक्षांची काठीण्य पातळी वाढवण्याचे नियोजन, संगणक प्रणालीद्वारे उत्तरपत्रिका करून दिल्या जातात. 

महावीर क्लासेसचे स्वतःचे अद्ययावत ग्रंथालय आहे. क्लासेसच्या अनेक विद्यार्थ्यांना नामांकित मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. मूलभूत तयारी व पक्का पाया या बळावर अनेक विद्यार्थी देश-विदेशात उत्तुंग करिअरचे यश चाखत आहेत. मेडिकल व इंजिनिअरिंग क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि दर्जेदार महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता लक्षात घेता शेवटच्या टप्प्यातील योजनाबद्ध व केंद्रित तयारी अत्यंत महत्त्वाची ठरते. नीट व एमएच-सीईटीच्या माध्यमातून उत्तम मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी हा क्रॅश कोर्स उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या उपक्रमाला जळगाव सह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी विलंब न करता तत्काळ महावीर क्लासेस जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!