जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात दि.२८ रोजी सकाळी १० ते सायं ५.०० या वेळेत सॉफ्ट स्कील या विषयावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा ही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांना मिळालेल्या PMUSHA या केंद्रशासनाच्या उपक्रमावर आधारित आहे.
कार्यशाळेचे नियोजन के.सी.ई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयामार्फत केले जात असून विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील नोकरीच्या अनुषंगाने आवश्यक कौशल्ये यात समविष्ट केलेली आहेत. एकदिवसीय कार्यक्रमात एकूण चार अभ्यास सत्र समाविष्ट केले आहेत. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे आणि आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. साहेबराव भूकन सर उपस्थित राहणार आहेत. महेंद्र नेमाडे हे शिक्षणक्षेत्रात आवश्यक संगणक कौशल्ये आणि अध्ययन साहित्य निर्मिती द्वारे अध्यापन या विषयावर पहिल्या सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात योगेश पाटील टेक्नोटक्स कॉम्पुटर चे संचालक सायबर कौशल्ये आणि सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. तर कार्यशाळेचे तृतीय सत्र मध्ये डॉ. योगेश चौंधरी रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक अर्ज प्रणाली आणि उपलब्ध ऑनलाईन प्रणाली जसे likedin याचा प्रत्यक्ष उपयोग यावर माहिती देण्यात येईल.
कार्यशाळेच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. योगेश महाले हे मार्गदर्शक सूत्रसंचालन कौशल्ये आणि त्यातूने रोजगार निर्मिती याविषयी मार्गदर्शन विद्यार्थी यांना देतील. कार्यशाळेचे नियोजन हे डॉ. केतन चौधरी करीत असून विद्यार्थ्यांना रोजगार मध्ये कौशल्यांचा उपयोग करण्याविषयी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केलेले आहे. ही कार्यशाळा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्नित महाविद्यालयमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
