जळगाव | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, जळगाव हे माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी जिल्हा परिषद समोर आज सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, गेल्या वर्षभरापासून जिल्हा आरोग्य अधिकारी विभाग जळगाव यांचेकडे माहिती अधिकारात दिनेश भोळे यांनी अर्ज आणि अपील केले असता जिल्हा आरोग्य अधिकारी मात्र माहिती देण्यास टाळाटाळ करत असून खरेदी प्रक्रिया व मनुष्यबळ भरती प्रक्रियेत झालेला भ्रष्टाचार व गैरव्यवहार लपवत असल्याचे भोळे यांचे म्हणने आहे.
दिनेश भोळे यांनी मागितलेली माहिती ही ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’ यंत्रणेशी संबंधित असून या विभागात बांधकाम आणि साहित्य खरेदीसाठी बेकायदेशीररीत्या निधी खर्च, मनुष्यबळ भरती केल्याने संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचा गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता असल्यानेच विभागाकडून मला माहिती उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. जोपर्यंत माझ्या सर्व अर्जाची माहिती मला परिपूर्ण मिळत नाही तोपर्यंत सकाळी १० वाजेपासून शासकीय कामकाजाच्या वेळेत मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या दालनाच्या बाहेर शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करणार असल्याचे दिनेश भोळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

भ्रष्टचाराला आळा घालण्याकरिता केलेल्या या ठिया आंदोलनात सहभागी झालेच पाहिजे अशा भ्रष्टाचाराचा बिमोड करायला साथ द्यायला पाहिजे