मुंबई, दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज )- राष्ट्रवादीतील (शरद पवार) एका बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या भाजपच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याची माहित समोर येत आहे. हा नेता पश्चिम महाराष्ट्रातील असल्याचं सांगितलं जातंय. या नेत्याला दीर्घकाळ राज्यातील महत्त्वाची खाती सांभाळण्याचा अनुभव आहे. तसेच त्यांचं सहकार क्षेत्रातही मोठं नाव आहे. त्यामुळे भाजपसोबत जाणारा तो नेता कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
लोकसभा २०२४ निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्षात घेऊन भाजपने मराठवाड्यात आपली ताकद वाढवलीआहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, भाजपकडून या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा जिंकायच्या असतील, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांतील महत्त्वाचे नेते आपल्यासोबत आणले पाहिजेत तरच ते शक्य होईल,यासाठीच भाजप प्रयत्नशील आहे.
