Headlines
Home » क्राईम » धक्कादायक: नशिराबाद येथे २२ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक: नशिराबाद येथे २२ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव | दि.२५ (वास्तव पोस्ट न्यूज)– जळगाव येथुन जवळच असलेल्या नशिराबाद येथे एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी आठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली. विवाहितेच्या लहान मुलीच्या रडण्यामुळे ही घटना उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असुन नशिराबाद गावामध्ये शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज सकाळ पासूनच सर्वत्र धूलिवंदनाची धामधुम व रंगबीरंगी रंगांची उधळन होतं होती. मात्र नशिराबाद येथील एका महाजन कुटुंबाची सकाळ मात्र बेरंग झाली होती. झाले असे की, नशिराबाद येथे खालच्या आळीत अमित महाजन हे आपल्या परिवारासह वास्तव्यास असुन अमित महाजन यांचा खाजगी व्यवसाय आहे. अमित महाजन हे आज सकाळी त्यांचे वडिल व नातेवाईकांसोबत मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. अमित महाजन यांच्या पत्नी जयश्री महाजन व त्यांची तीन वर्षांची लहान मुलगी या दोघी घरीच थांबल्या होत्या.

अमित व जयश्री यांच्या तीन वर्षाच्या लहान मुलीचा रडण्याचा आवाज बाहेर शेजारपाजाऱ्यांना ऐकायला आला. बराच वेळ झाला तरी मुलीचे रडणे थांबत नाही, म्हणून शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता जयश्री महाजन यांनी गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यांनी लागलीच महाजन कुटुंबीय व नातेवाईकांना ही घटना कळवली.

दरम्यान जयश्री महाजन यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जळगाव येथे दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीकरुन त्यांना मृत घोषित केले. मृत समयी जयश्री अमित महाजन यांचे वय २२ वर्ष होते. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, ३ वर्षांची मुलगी आणि सासरे असा परिवार आहे. नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!