Headlines
Home » जळगाव » सावखेडा येथे विधि सेवा शिबिरात विविध कायद्यांविषयी चर्चासत्र संपन्न

सावखेडा येथे विधि सेवा शिबिरात विविध कायद्यांविषयी चर्चासत्र संपन्न

जळगाव (वास्तव पोस्ट) : तालुक्यातील सावखेडा गावी मातोश्री आनंदाश्र मध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्तमानाने विधी सेवा शिबीर चा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक यांना अध्यक्षस्थान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ऐश्वर्या मंत्री यांनी वर्धमान युनिव्हर्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांना सीनियर सिटीजन कायद्या संबंधी विधीचे धडे दिले. तसेच विविध कायद्याविषयी चर्चासत्र देखील राबविण्यात आले.

यावेळी पास्को कायदा, शिक्षण अधिकार कायद्या संदर्भात माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यर्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर शिबिरास शाळेचे कर्मचारी, शिपाई आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!