विद्यार्थी रोहित पाटील, हृषिकेश पाटील यांच्या गौरव प्रसंगी डॉ. पराग नारखेडे, डॉ. बी.व्ही. पवार, प्रा. पुनीत शर्मा आणि डॉ. ममता दहाड.
जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमधील परिसर मुलाखतीतून एमबीए द्वितीय वर्षाच्या रोहित पाटील आणि हृषिकेश पाटील यांची निवड एचडीएफसीत मॅनेजमेंट ट्रेनी या पदावर झाली आहे.
यानिमित्त केसीईचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि आयएमआरचे संचालक डॉ. बी.व्ही. पवार यांनी रोहित व हृषिकेशचे कौतुक केले. एचडीएफसीतर्फे महेश तळेले यांनी, तर आयएमआरतर्फे प्रा. पुनीत शर्मा यांनी संयोजन केले. विद्यार्थ्यांच्या गौरव प्रसंगी आयएमआरचे संचालक डॉ. बी.व्ही.पवार, डॉ.पराग नारखेडे, प्रा. पुनीत शर्मा, डॉ.ममता दहाड आदी उपस्थित होते.