Headlines
Home » जळगाव » केसीई इंजिनिअरींग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन व पोस्टर प्रेझेंटेशन

केसीई इंजिनिअरींग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन व पोस्टर प्रेझेंटेशन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर प्रेझेंटेशनचे आयोजन करण्यात आले होते. यात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात एनर्जी कॉन्झरवेशन, कॉन्व्हेन्शनल एनर्जी, नॉन रिन्यूएबल रिसोर्स, तर पोस्टर प्रेझेंटेशन करीता भारतीय पुरातन इतिहास या विषयावर विविध कल्पनांनी प्रकल्प सादर केले.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रभावी उपकरणांचे ज्ञान प्राप्त करावे आणि ते वैज्ञानिक अभ्यासांचा उपयोग करून त्यांचे अभ्यास समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला संशोधनात्मक विचारांना चालना मिळेल. विद्यर्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास हे प्रदर्शन खूप उपयोगी पडेल. प्रदर्शनाचा उपक्रम सतत सुरु असावा असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांनी मांडले.

कार्यक्रमाकरीता प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा.के.बी. पाटील, अकॅडमिक डीन डॉ.सी.एस. पाटील, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा.गणेश पाटील, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली .

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!