वास्तव पोस्ट l म्हसावद : स्वातंत्र्य सैनिक पं.ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालययात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ‘मानवता हीच खरी ईश्वर सेवा’ हा संदेश देणाऱ्या या थोर संताच्या विचारांचा जागर याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.डी. बच्छाव, उप मुख्याध्यापक एस.के. भंगाळे आणि पर्यवेक्षक के.पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य जी.डी. बच्छाव यांनी गाडगे महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “गाडगे बाबांनी स्वच्छतेतून भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांचे विचार केवळ ऐकण्यासाठी नसून ते आचरणात आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” विद्यार्थ्यांनी महाराजांचा सेवाभाव आणि समाजसुधारणेचा वारसा जोपासावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक एस.एम. नेतकर, एस.सी. बाविस्कर, एन.के. अहिरे, एस.जे. पवार आणि ज्येष्ठ शिक्षिका अनिता नेवे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पी.पी. मगरे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंदाने सहकार्य लाभले.

