Headlines
Home » जळगाव » ओरीअन स्कूल येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

ओरीअन स्कूल येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ यांचा जन्म दि.१२ जानेवारी १५३१ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावी झाला. तर स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ साली कलकत्ता येथे झाला.

माँसाहेब जिजाऊ ह्या त्यांच्या सद्गुण,शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जातात. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या. माता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई आहेत.

स्वामी विवेकानंद यांनी धर्म आणि संस्कृती विषयी जनजागृती केली व रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशन, वेदांत सोसायटी यांची स्थापना केली.

या कार्यक्रमात किनगे शिवण्या महेश (ज्यु. के.जी गंगा), रणधीर श्रावणी संजय (ज्यु. के.जी गंगा), पाठक स्वरा राहुल (ज्यु. के.जी. यमुना) यांनी राजमाता जिजाऊ यांचा पोशाख परिधान करून त्यांच्या विषयीचे विचार मांडले. राऊल शिवतेज किरण (ज्यु. के.जी. यमुना), सोनवणे मयंक आशिष (सिनियर के.जी.) यांनी स्वामी विवेकानंद यांचा पोशाख परिधान करून त्यांच्या जीवना विषयी विचार मांडले.

इयत्ता दुसरी मधून गोजोरकर चेरिषा किशोर (२ री गंगा), बारी ईशानी अमर (२ री गंगा) ह्या विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांचे पोशाख परिधान करून त्यांच्या जीवना विषयीचे विचार मांडले, तसेच तांबटकर रियांश राहुल (२री यमुना) ह्या विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंद यांचा पोशाख परिधान करून त्यांच्या जीवना विषयीचे विचार मांडले. सुत्रसंचलन जयश्री तळेले यांनी केले.

सदर कार्यक्रमा प्रसंगी शाळेचे प्राचार्य श्रीधर सुनकरी, उप प्राचार्या रजनी गोजोरेकर तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!