Home » राजकीय » राज ठाकरेंची भाजपसोबत मैत्री संपली! मनसे विधानसभेच्या २२५ जागा एकट्याने लढवणार

राज ठाकरेंची भाजपसोबत मैत्री संपली! मनसे विधानसभेच्या २२५ जागा एकट्याने लढवणार

VIDHAN SABHA 2024 : सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२४ मध्ये संपणार आहे. त्यामुळे राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस १३ खासदारांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे यावेळच्या विधानसभेत मोठी चुरस बघायला मिळेल.

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत २०० ते २५० जागांवर एकटेच लढणार असल्याचे जाहीर केले. याआधी मनसेही सत्ताधारी महायुती आघाडीत सामील होऊन विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. महाआघाडीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांचा समावेश आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील महायुती सरकारवर सडकून टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, खड्डे दुरुस्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत. ‘लाडली बहन’ आणि ‘लाडला भाई’साठी ते पैसे कसे जमवतील? यावेळी ठाकरे यांनी पक्षातील पक्षांतराच्या अटकळींवरही भाष्य केले. ते म्हणाले, “मी ऐकले आहे की, माझ्या पक्षातील काही लोकांनाही दुसऱ्या पक्षात जायचे आहे. मी त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरतो. ते लगेच निघू शकतात, त्यांचच खरं नाही तर तुम्हाला कुठे बसवतील.”

मनसे प्रत्येक जिल्ह्यात सर्वेक्षण करत असल्याचा खुलासा राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत केला. ते म्हणाले, सर्वेक्षण करण्यासाठी मी प्रत्येक जिल्ह्यासाठी ४ ते ५ सदस्यांची नियुक्ती केली होती. त्या भागातील नामवंत लोक आणि पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आता हीच टीम दुसऱ्या फेरीचे सर्वेक्षण करणार आहे.

मनसे आगामी विधानसभेसाठी कोणाशीही युती करणार नाही :

पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांशी निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी १ ऑगस्टपासून महाराष्ट्राचा दौरा सुरू करणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. ते म्हणाले, “आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत २०० ते २५० जागा लढवू. मला माझ्या कार्यकर्त्यांना कोणत्याही किंमतीत सत्तेत बसवायचे आहे. आगामी निवडणुकीसाठी तुम्ही कठोर परिश्रम करावेत अशी माझी इच्छा आहे. असे मनसेप्रमुख यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतांना आपले मत व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!