नवी दिल्ली, दि. १४ ( वास्तव पोस्ट न्यूज )– भारतात नुकत्याच अयोद्धया येथे राममंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडल्या नंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यूएईच्या अबूधाबी येथे भव्य मंदिराचं उद्घाटन केलं.
अबुधाबी-दुबई महामार्गावरील अबु मुरेखा भागात UAE सरकारने दिलेल्या २७ एकर जागेवर मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. तापमान मोजण्यासाठी आणि भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या मंदिरात ३०० हून अधिक हाय-टेक सेन्सर बसवण्यात आले आहेत. मंदिराच्या बांधकामात कोणत्याही धातूचा वापर करण्यात आलेला नाही आणि पाया भरण्यासाठी फ्लाय ॲश (कोळसा-आधारित वीज प्रकल्पातील राख) वापरण्यात आली आहे. सुमारे ७०० कोटी रुपये खर्चून हे मंदिर बांधण्यात आले आहे.
बोचसनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (बीएपीएस) मंदिराच्या या उद्घाटनानंतर बहरीन या मुस्लिम देशातही मंदिर बनत आहे. बहरीन येथे बीएपीएस मंदिर उभारणार आहे. मंदिरासाठी लागणारे जमीनीचे अधिग्रहण झाले असून मंदिर उभारण्यासाठीच्या सगळ्या औपचारिकता पूर्ण झाल्याने लवकरच मंदिराच्या बांधकामास सुरुवात होणार आहे.
बहरीन येथील मंदिर देखील अबूधाबीच्या मंदिराप्रमाणेच भव्य दिव्य असेल. अबूधाबी येथील मंदिराचा खर्च ७०० कोटी इतका आहे. बहरीन इथल्या मंदिरासाठीही भरपूर खर्च होणार आहे. या मंदिराचं निर्माण बोचसनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या वतीने होणार आहे. बीएपीएसच्या प्रतिनिधी मंडळाने बहरीनचे क्राऊन प्रिन्स सलमान बिन हमाद अल खलिफा यांची भेट घेतली आहे.
