Headlines
Home » राजकीय » राजकीय भूकंप , बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा ; ९ व्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ .

राजकीय भूकंप , बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा ; ९ व्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ .

मुंबई ( प्रतिनीधी ) दि .२८, नितीश कुमार यांनी त्यांच्या बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केल्यानंतर आज बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये राजकीय समिकरणं पुन्हा एकदा बदलली आहेत.

बिहारमध्ये याआधी आरजेडी आणि जेडीयूचं सरकार होतं. परंतु या सरकारमधून बाहेर पडून भाजपा सोबत जाण्याचा निर्णय नितीश कुमार यांनी घेतल्याने आता बिहारमधील राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आहे.
नितीश कुमार यांनी थोड्यावेळा पूर्वी राजभवनात ९व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . नितीश कुमार यांच्यासह भाजपचे सम्राट चौधरी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची व इतर ८ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली . यावेळी राजभवनात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे देखील उपस्थित होते .

बिहारमध्ये सत्तापालटली असून महाराष्ट्रानंतर बिहारच्या राज्य सरकारची समिकरणं पुन्हा एकदा बदलली आहेत. तसेच या सगळ्या नाट्यमय घडामोडीत बिहारचे प्रभारी विनोद तावडे बिहारला या आधीच पोहचले होते.
महाआघाडीत परिस्थिती योग्य नाही – नितीश कुमार
राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. महाआघाडीमध्ये परिस्थिती योग्य नाही आता आम्ही इंडिया आघाडीतुही बाहेर पडणार आहोत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!