जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण या थीमवर आधारित पर्यावरण दिन जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये साजरा करण्यात आला. पश्चिम आफ्रिकेतील माली सेनेगल व मंजरी फाऊंडेशन राजस्थान येथील पाहुण्यांच्या हस्ते जैन हिल्स परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
जैन हिल्सच्या गुरूकूल पार्किंगजवळ आफ्रिकेतील पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. सूक्ष्मसिंचनासह प्रगत तंत्रज्ञानातून शेती बाबतचे ज्ञान घेण्यासाठी एका विशेष ट्रेनिंग जैन हिल्सच्या गुरुकूल सुरु आहे त्यात त्यांनी सहभाग घेतला. वृक्षारोपणावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, डॉ. बी. डी. जडे, राजेश आगीवाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, अशोक चौधरी, जैन इरिगेशनचे अजय काळे, मनोहर बागुल, संजय सोन्नजे, रोहित पाटील, हर्षल कुळकर्णी उपस्थित होते.

जैन फूडपार्क येथे ही पर्यावरण दिवस साजरा केला गेला. जैन व्हॅलीमध्ये टि.यू.व्ही. नॉर्डचे ऑडिटर गिरीश ठुसे यांच्या प्रमूख उपस्थित वृक्षारोपण झाले. यावेळी सुनील गुप्ता, बालाजी हाके, वाय. जे. पाटील, जी. आर. पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण केले गेले. फायर सेफ्टी विभागाचे कैलास सैदांणे व सहकारी पंकज लोहार, निखिल भोळे, मनोज पाटील, महेंद्र पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी वृक्षारोपण केले.
जागतिक पर्यावरण दिन एक विशिष्ट थीम सह साजरा केला जातो – हवामान बदलापासून ग्लोबल वॉर्मिंगपासून ते जंगलतोडीपर्यंत तात्कालिक समस्यांना लक्ष्य करून. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची थीम ‘जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण’ ही आहे. वाळवंटीकरणाचा मुकाबला करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या करारानुसार पृथ्वीवरील ४० टक्के जमीन खराब झाली असून त्याचा थेट फटका जगातील निम्म्या लोकसंख्येला बसत आहे. २००० पासून दुष्काळाची संख्या आणि कालावधी २९ टक्क्यांनी वाढला आहे त्यावर तातडीची उपाययोजना न केल्यास २०५० पर्यंत जगातील तीन चतुर्थांश लोकसंख्येवर दुष्काळाचा परिणाम होऊ शकतो,” यासाठी वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प सहकाऱ्यांनी घेतला.
