भडगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील गुढे येथे संत सेना महाराज मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात कलश स्थापना व मूर्ती मिरवणुकीत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभागी होऊन आशिर्वाद घेतले.
या संदर्भातील वृत्त असे की, गुढे येथे संत सेना महाराज यांच्या भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली असून आजपासून याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला आहे. आज पहिल्या दिवशी कलश स्थापना करण्यात आल्यानंतर मूर्तीची गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यात वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी या सहभागी झाल्या.
प्रारंभी वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. यामध्ये महिलांचा समावेश लक्षणीय होता. यात वैशालीताई यांच्या सोबत अनिल नामदेव मोरे, रवींद्र चिंधा मोरे, गौतम अंबू मोरे, गौतम गंभीर मोरे, संतोष राहुल मोरे, मच्छिंद्र विकास मोरे प्रकाश आबा बागुल, वाल्मीक युवराज बागुल, आकाश सुरेश पवार, गौतम श्रावण मोरे, पोपट माणिक मोरे, आबा अशोक मोरे किशोर भाऊ मोरे नाना सुपडू मोरे, सतीश अभिमन पाटील, तुकाराम हिलाल माळी, महेंद्र एकनाथ माळी, संजय भिकन पाटील, संजय सुधाकर पाटील आदी मान्यवर शोभायात्रेत सहभागी झालेत.