Headlines
Home » क्रीडा » म.न.पा. जळगाव द्वारा आयोजित सॉफ्टबॉल स्पर्धेत ओरियन स्टेट बोर्ड स्कूल विजयी

म.न.पा. जळगाव द्वारा आयोजित सॉफ्टबॉल स्पर्धेत ओरियन स्टेट बोर्ड स्कूल विजयी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : म.न.पा. जळगाव द्वारा आयोजित सॉफ्टबॉल स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम जळगाव येथे घेण्यात आल्या. यात ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूलच्या विद्यार्थिनींनी प्रथम स्थान पटकावत विभाग स्तरावरील स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित केला. आणि विभाग स्तरावरील सामन्यातही तृतीय स्थान मिळवत कांस्य पदक मिळविले.

संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि शाळेचे प्राचार्य श्रीधर सुनकरी सर, उप प्राचार्या रजनी गोजोरेकर यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे खूप खूप अभिनंदन केले. सदर विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक आकाश सराफ सर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!