Home » जळगाव » जागतिक महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे विवीध क्षेत्रातील ४१ महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे विवीध क्षेत्रातील ४१ महिलांचा सन्मान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जागतिक महिला दिनानिमित्त दि.७ मार्च रोजी विवीध क्षेत्रातील ४१ महिलांचा हॉटेल आयव्हरी टस्क येथे सन्मान आणि सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार स्मिता वाघ, गोदावरी फाऊंडेशन च्या डॉ.केतकी पाटील, आय.एम.ए. च्या सचिव डॉ.अनिता भोळे, जळगाव शहर महानगरपालिका च्या उपायुक्त निर्मला गायकवाड, तसेच धनश्री शिंदे, अश्विनी गायकवाड, डॉ.आरती शिलाहार प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.

जेष्ठ समाजसेविका भारती कुमावत लिखीत विवाह पलिकडील सत्य या महिलांवर लिहीलेल्या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवर अतिथींच्या हस्ते करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या मुहुर्तावर या पुस्तकाची पर्वणी सार्थक झाल्याची भावना पुस्तकाच्या लेखिका भारती कुमावत यांनी यावेळी व्यक्त केली.

सेवा मे स्वर्ग या एस.डी.फाऊंडेशन च्या ब्रीदवाक्य ला जागून विवीध क्षेत्रात सेवा करत राहु, तसेच आपल्या माता भगीणींचा सत्कार करणे आणि समाजात त्यांचा सन्मान वाढवणे हे आमचे कर्तव्यच आहे, असे एस.डी. फाऊंडेशन चे सचिव सुहास दुसाने यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमास एस.डी. फाऊंडेशन चे अध्यक्ष सुधाकर दुसाने, उपाध्यक्ष छोटू पाटील, भाग्यश्री दुसाने, रोहिणी विसपुते, जयश्री बऱ्हाटे, चेतन दुसाने, संतोष आहुजा, जतिन इंगळे, प्रभुदत्त दुसाने आणि इतर सहकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!