जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आज ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
जीवनात वृक्षांचे महत्व अनन्यसाधारण आहे म्हणून आपण वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन केले पाहीजे ह्याच हेतुने पर्यावरण दिनानिमित्त जळगाव येथील एस. एस. मणियार महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ.विजेता सिंग यांनी जळगाव येथील मेहरूण तलाव परिसरात आज वृक्षारोपण केले.
