Headlines
Home » आंतरराष्ट्रीय » ऑलिम्पिक: भालाफेकमध्ये भारताच्या नीरजला रौप्य ; तर पकिस्तानच्या अर्शदला सुवर्ण पदक

ऑलिम्पिक: भालाफेकमध्ये भारताच्या नीरजला रौप्य ; तर पकिस्तानच्या अर्शदला सुवर्ण पदक

Neeraj Chopra Silver Medal : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत रौप्यपदक मिळवले तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नव्या ऑलिम्पिक विक्रमासह भालाफेकीचे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.

पॅरिस ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारताच्या नीरज चोप्राने आपल्या कारकीर्दीतली सर्वोत्तम कामगिरी करत दुसऱ्या प्रयत्नात ८९.४५ मिटर दुरवर भाला फेकून रौप्यपदक मिळवले. तर अर्शद नदीमनं दुसऱ्या प्रयत्नात ९२.९७ मीटर्सवर भाला फेकत सुवर्ण पदकाची कमाई केली.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आता एक रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण पाच पदकं जमा झाली आहेत. नीरज चोप्राचं हे दुसरं ऑलिम्पिक पदक आहे. त्याने गेल्यावेळी टोकियोत सुवर्णपदकाची कमाई केली होती. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात दोन पदकं पटकावणारा नीरज चोप्रा हा चौथा खेळाडू ठरला आहे. याआधी पैलवान सुशीलकुमार, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि नेमबाज मनू भाकर यांनी दोन-दोन पदकांची कमाई केली आहे.

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने रचला इतिहास !

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या अंतिम फेरीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सर्वांना चकित केले. नीरज चोप्राप्रमाणेच त्याचा पहिला प्रयत्नही फाऊला होता, मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने ९२.९७ मीटरवर भालाफेक करून ऑलिम्पिक विक्रम केला. याआधी भालाफेकचा ऑलिम्पिक विक्रम नॉर्वेच्या अँड्रियास थॉर्डकिलसेनच्या नावे होता. त्याने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ९०.५७ मीटर भालाफेक केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!