Headlines
Home » जळगाव » आता तालुकास्तरावरच होणार तक्रारींचा निपटारा ; महिन्यातून दोन वेळा तक्रार निवारण दिन

आता तालुकास्तरावरच होणार तक्रारींचा निपटारा ; महिन्यातून दोन वेळा तक्रार निवारण दिन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : 1वर्षानुवर्ष असलेल्या त्याच त्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या संबंधित असलेल्या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या विविध शाखा कार्यालयाना नागरिक तसेच कर्मचाऱ्यांना मुक्ती मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाला यांच्या अभिनव संकल्पनेतून दर महिन्यातून दोन वेळा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व विभाग प्रमुख यांच्या समवेत तालुक्यात स्तरावर तक्रार निवारण दिन घेण्यात येणार आहे यातून सर्व प्रकारच्या तक्रारी चे जागच्या जागी निराकरण करण्यात येणार आहे.

शासकीय कार्यालय म्हटले की वर्षानुवर्ष प्रलंबित तक्रारी विविध प्रकारच्या निर्णयाच्या फायलींसाठी माराव्या लागणाऱ्या चकरा त्यातून होणारा मनस्ताप असा अनुभव कित्येकदा सामान्य नागरिकांसह कर्मचाऱ्यांना येत असतो नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नव्यानेच रुजू झालेल्या मीनल करनवाल यांनी कार्यभार स्विकारल्यावर काही दिवसातच संबंधित विभागाचा आढावा घेऊन अनेक वर्षापासून पडून असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

■ दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी आयोजन

यातूनच त्यांनी तालुक्या स्तरावर महिन्यातून दोन वेळा तक्रार निवारण दिन घेण्याचा व प्राप्त तक्रारींचा जागाच्या जागी निपटारा करण्याचा निश्चय केला आहे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख तालुकास्तरावर जाणार असून तालुक्यात स्तरावर तक्रार निवारण दिन घेणार आहेत.

■ सामान्य नागरिकांच्या फेऱ्या वाचणार

या तक्रार निवारण दिनी प्राप्त होणाऱ्या विविध प्रकाराच्या प्रशासकीय तक्रारीवर साधक बाधक चर्चा करून त्या तक्रारींचे जागच्याजागी निराकरण करण्यात येणार आहे यामुळे अनेक दिवस साचणाऱ्या तक्रारी विविध प्रकारच्या समस्या या अत्यंत जलद पद्धतीने वेळेच्या वेळी सोडवल्या जाणार आहेत अत्यंत अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिक तसेच कर्मचाऱ्यांना विविध प्रकारे पासून तसेच वारंवार शासकीय कार्यालयात मारायला लागणारे चकरा पासून मुक्ती मिळणार आहे.

  1. ↩︎

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!