नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर गेले आहे. याच दौऱ्यात नायजेरियाला भेट दिल्यावर मोदी हे ब्राझील आणि गयाना या देशांना भेटी देणार आहेत. नायजेरियात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. त्यांना नायजेरियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रँड कमिसर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर’ (जीकॉन)ने सन्मानित करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी यांना रशियाने देखील असाच सर्वोच्च सन्मान दिला होता. या पूर्वी १७ देशांनी त्यांना या प्रकारे सन्मानित केलं आहे. नायजेरियात पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबूच्या निमंत्रणावरून त्यांनी नायजेरियाला भेट दिली.
पंतप्रधान कार्यायल्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी अबुजा येथे दाखल झाले आहेत. नायजेरियाचे मंत्री न्यासोम एजेनवो वायके यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यांनी पंतप्रधानांना अबुजा शहरातील खास भेट दिली.
परराष्ट्र मंत्रालयानेही पंतप्रधानांच्या स्वागताचे काही फोटो शेअर केले आहेत. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष तिनुबू यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देताना आपण भारतीय पंतप्रधानांचे स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे म्हटलं आहे. दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारी वाढवणं व महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण हे आमच्या द्विपक्षीय चर्चेचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर राष्ट्राध्यक्ष तिनुबू यांनी पंतप्रधान मोदी, नायजेरियात तुमचे स्वागत आहे. असं एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. नायजेरियन राष्ट्राध्यक्षांच्या या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदी आभार मानले आहे. मोदी म्हणाले, “धन्यवाद, राष्ट्राध्यक्ष टिंबू. मी नायजेरियाला पोहोचलो. येथील स्वगताने मी भारावलो आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, अशी मला आशा आहे.
