Headlines
Home » क्राईम » रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाची तपासणी एनआयएकडे; संशयीत सीसीटीवी मध्ये कैद !

रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाची तपासणी एनआयएकडे; संशयीत सीसीटीवी मध्ये कैद !

बंगळुरू | दि.०४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – बंगळुरू येथे रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे. गृह मंत्रालयाच्या हवाल्याने आज सोमवार रोजी ही माहिती देण्यात आली. सूत्रांनी सांगितले की, स्फोटातील संभाव्य संशयित आरोपी हा परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसुन आला. संशयिताने टोपी, मास्क आणि चष्मा घातलेला होता. मात्र, अद्यापही त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. १ मार्च रोजी पूर्व बंगळुरूच्या ब्रुकफिल्ड येथील रामेश्वरम कॅफेत झालेल्या स्फोटात एकूण नऊ जण जखमी झाले होते.

या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी दिले. कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी पुढे सांगितले की, त्यांनी आतापर्यंत स्फोटाचे जवळजवळ ४०/५० सीसीटीव्ही फुटेज मिळवले असुन तपासकामी अनेक पथके तयार करण्यात आली असुन पथकास काही पुरावे मिळाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून काही माहिती गोळा करण्यात आली आहे. संशयित हा बसने आल्याची माहिती आहे. वृत्तसंस्था पीटीआयने सांगितले की, बस प्रकरण उघडकीस आल्यानंतर बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची देखील चौकशी केली जात आहे.

स्फोटामागे व्यावसायिक कारणही असू शकते, असा दावा कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी केला आहे. मात्र रामेश्वरम कॅफेच्या मालकाने सांगितले की, आमचे कोणाशीही व्यावसायिक शत्रुत्व नाही. हॉटेल व्यावसायिक हे माझ्या भावा-बहिणींसारखे आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!