Headlines
Home » जळगाव » राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबीर उद्घाटन सोहळा संपन्न

राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबीर उद्घाटन सोहळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च,जळगाव च्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित विशेष हिवाळी शिबीराचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या शिबिराचे उद्घाटन कार्यक्रम अध्यक्ष महाविद्यालयाचे संचालक डॉ.बी.व्ही.पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन समारंभात बोलताना कार्यक्रम अध्यक्ष यांनी युवकांनी समाजसेवेचे महत्त्व ओळखून राष्ट्रीय सेवा योजनेतून व्यक्तिमत्त्व विकास व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन शिक्षण अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.पराग नारखेडे व इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव येथील संगणक विभागाच्या प्रमुख डॉ.वर्षा पाठक उपस्थित होते.

शिबिरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार असून, यात स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी शिबिरे, पर्यावरण संरक्षण उपक्रम आणि गावातील गरजूंसाठी मदतकार्य यांचा समावेश आहे. या शिबिरात ०६ मार्च ते १२ मार्च २०२५ दरम्यान स्वयंसेवक विविध सेवा कार्ये पार पाडणार आहेत.

कार्यक्रमाचे पसूत्रसंचालन रासेयो स्वयंसेवक सौरभ माळी यांनी केले. शिबिराच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी एस.एन.खान, विद्यार्थी विकास अधिकारी प्रकाश बारी, शिबिर प्रमुख गीता सूर्यवंशी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!