चोपडा, दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– तंबाखू गुटख्याच्या व्यसनामुळे कॅन्सर झाला त्यावर यशस्वीपणे मात करून तंबाखू, गुटखा विरोधी व्यसनमुक्ती अभियान व कॅन्सर जनजागृती अभियान १२ वर्षांपासून यशस्वीपणे राबवून जळगाव जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर घेऊन जाणारे चोपडा शहरातील रहिवासी आरोग्यदूत राज मोहम्मद खान शिकलगर यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.
त्यांना एन. एस.एफ. तर्फे दिला जाणारा टोबॅको फ्री इंडियाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना येत्या १६ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे टोबॅको फ्री इंडियाच्या राष्ट्रीय सम्मेलनात प्रमुख मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यामुळे राज मोहम्मद शिकलगर यांच्यावर सर्व स्तरावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
