Home » क्राईम » चारित्र्याच्या संशयावरून चाकूने भोसकून पत्नीची हत्या ; पती फरार

चारित्र्याच्या संशयावरून चाकूने भोसकून पत्नीची हत्या ; पती फरार

मुंबई | दि.५ ( वास्तव पोस्ट न्यूज) – येथील मलबार हिल परिसरातील शिमला नगर झोपडपट्टी येथे राहणाऱ्या अजय वर्धम (वय ३८) याने पत्नी अंजली (वय ३६) हीची चाकूने भोसकून हत्या केली. या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात मृत अंजली वर्धमच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी मलबार हिल पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम ३४, ३०२ आणि २०१ अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोहितकुमार गर्ग यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

रात्री १० वाजताच्या सुमारास जेवणावरून पती पत्नीत वाद झाला, त्यानंतर भांडणाचे पर्यवसन हत्येत झाले. भांडण झाले त्यावेळी आरोपी अजय याने मद्यधुंध अवस्थेत असल्याची माहिती अंजलीच्या चुलत बहीणीने दिली. चारित्र्यावर संशयावरून हत्या झाल्याचे समजते. हत्या झाल्यानंतर अंजलीचा मोठा मुलगा जवळच राहणाऱ्या त्याच्या मामा अशोक यांना बोलावले. अंजली ह्या जमिनीवर कोसळलेल्या होत्या बेशुद्ध अवस्थेत अंजलीला भाऊ अशोक याने अंजलीला भाटिया रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले.

अजय आणि त्याच्या आईने संगनमत करून अंजलीची हत्या केली. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी घरातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्याविरुद्ध तक्रार दिल्याने मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. अजयच्या आईलाही अटक करण्यात आली असून आरोपी पती फरार आहे. त्याला अटक करण्यासाठी मलबार हिल पोलिसांनी पथकं स्थापन केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोहितकुमार गर्ग यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!