Headlines
Home » सांस्कृतिक » विठ्ठल नामाच्या गजरात मुक्ताईच्या पालखीचे जल्लोषात स्वागत

विठ्ठल नामाच्या गजरात मुक्ताईच्या पालखीचे जल्लोषात स्वागत

कजगाव ( प्रतिनिधि ) दिपक अमृतकर | कजगाव ता.भडगाव येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही मुक्ताई पालखीचे स्वागत करण्यात आले. आप्पा महाराज जळगावकर यांनी दीडशे वर्षापूर्वी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे जळगाव ते पंढरपूर पायी दिंडीचे आजही यशस्वीपणे कार्य चालू आहे. ह.भ.प.मंगेश महाराज जळगावकर यांच्या नेतृत्वाखाली निघत असलेल्या दिंडीचे दरवर्षी प्रमाणेच यंदाही वाजत गाजत स्वागत करण्यात आले.

यावेळी पालखी मिरवणुकीत शेकडो भाविक नृत्याचा आनंद घेत भक्तिमय वातावरणात तल्लीन झाले होते. दिंडीचे संचालक मंगेश महाराज यांची बग्गितून मिरवणूक काढण्यात आली यावेळी मुक्ताईच्या पालखीचे पायघड्या घालून व रांगोळ्या टाकून स्वागत करण्यात आले. पेट्रोल पंपासून ते जुनेगाव पर्यंत टाळ मृदुंगाच्या गजरात ठेका धरत ग्रामस्थांनी स्वागत केले. तब्बल दीडशे वर्षांपासूनची परंपरा असलेल्या मुक्ताईच्या दिंडीचे कजगावशी विशेष नाते आहे.

मुक्कामी परंपरा प्रमाणे यंदाही दिंडीचा मुक्काम अमृतकर बंधुकडे होता. दिवंगत जमीनदार कै.त्र्यंबक अमृतकर व बेनिराम अमृतकर यांच्या कुटुंबाकडे त्यांच्या पश्चात आजही मुक्कामी असते. यंदाही परंपरे प्रमाणे त्यांच्या पश्चात असलेल्या त्यांच्या कुटूंबाने ही अखंडित परंपरा कायम ठेवली आहे. प्रभाकर अमृतकर, निवृत्ती अमृतकर, सोपान अमृतकर यांच्याकडे रात्रीचा महाप्रसाद व मुक्काम होता तसेच संध्याकाळी अशोक अमृतकर, जगन साठे, मच्छिंद्र पाटील यांच्याकडून थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली होती.

तब्बल पस्तीस वर्षापासून दिंडीत निःशुल्क सेवा देणारे चोपदार पोपट महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीची मिरवणूक संपन्न झाली. तसेच चाळीसगाव रस्त्यावरील पेट्रोलपंप पासून ते जुनेगाव पर्यन्त डीगांबर पवार यांच्या कुटुंबाकडून दिंडीचा मार्ग स्वच्छ करून दिंडीसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पायघड्या टाकण्यात आल्या होत्या. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!