जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे सात वर्षाखालील खेळाडूंसाठी बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन दि.३१ जुलै बुधवार दुपारी दोन वाजता करण्यात आले होते.
स्पर्धेत पहिल्या दोन विजेत्या खेळाडूंची निवड वसई जिल्हा पालघर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघात करण्यात आली. स्पर्धा ही स्विस लीग पद्धतीने एकूण पाच फेऱ्यांत घेण्यात आली. वसई येथे दिनांक तीन व चार ऑगस्ट येथे राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे.
अत्यंत चुरशीच्या वातावरणात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत पहिल्या पाच खेळाडूंना बक्षीस देण्यात आली. त्यात
- प्रथम क्रमांक मृगांक पाटील पाच गुण,
- द्वितीय क्रमांक कबीर श्रीकांत दळवी चार गुण,
- तिसरा क्रमांक हार्दिक रावलानी तीन गुण, विराज गाला दोन गुण, शुभुया शिरुडे
स्पर्धा कांताई सभागृह नवीन बस स्टँड जवळ येथे संपन्न झाल्या. स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे नथू सोमवंशी आकाश धनगर सोमदत्त तिवारी काम केले. अमरसिंग बोरसे, नथू सोमवंशी, यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षिसे देण्यात आली .
विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन सचिव नंदलाल गादिया व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी यांनी केले.
