Home » जळगाव जिल्हा » मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागल्याने दुखापत

मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागल्याने दुखापत

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील जवान नायक अर्जुन लक्ष्मण बावस्कर यांना आसाम – अरुणाचल सीमेवर देशाचे रक्षण करत असताना वीरमरण आले. भारत मातेचे या वीर सुपुत्रावर आज वरणगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंत्री गिरीश महाजन हे अंत्यसंस्कारास उपस्थित होते. शहीद जवानाचे पार्थिव शरीर एका ट्रकवर ठेवलेले होते. यावेळी पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मंत्री महाजन हे ट्रकवर चढत असतांना वर असलेला एक लोखंडी रॉड मंत्री महाजन यांच्या डोक्याला जोरात लागल्याने रक्तस्राव सुरु झाला. त्यांना उपचारासाठी तात्काळ वरणगाव येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारानंतर मंत्री गिरीश महाजन हे नाशिक येथे रवाना झाले. काळजी करु नका, माझी तब्येत ठीक आहे असे मंत्री महाजन यांनी सांगितले. एका महत्वाच्या मिटिंग साठी नाशिक येथे जात असल्याचे मंत्री महाजन म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!