Headlines
Home » जळगाव » बेघरांच्या स्वप्नातील ‘अमृत महाआवास योजना’ १०० टक्के यशस्वी करा : मंत्री गुलाबराव पाटील

बेघरांच्या स्वप्नातील ‘अमृत महाआवास योजना’ १०० टक्के यशस्वी करा : मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव (वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान स्वामित्व योजनेमुळे प्रत्येक गावाच्या गावठाणातील सर्व नमुना ८ अद्ययावत होवून ग्रामपंचायती मालमत्ता कर मिळून ग्राम्य पंचायतीचे स्वत:चे उत्पन्न वाढेल. शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षण होवून ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संवर्धन होईल. जिल्ह्यात जवळपास दिड लाख घरे यावर्षी बांधणार आहोत. लाभार्थी, गवंडी, साहित्य पुरवठादार यांचे मेळावे घेवून मोहीम स्वरूपात कामे सुरु करावीत.

स्वत:चे पक्के घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. बेघर आणि गरीब कुटुंबांना घरकुल बांधुन देण्याच्या महत्वाची जबाबदारी ही संधी समजुन प्रत्येकाने आत्मीयतेने काम केल्यास १००टक्के उद्दिष्टय पूर्ण होईल. घरकुल बांधकाम गतिमान व गुणवत्ता पूर्वक करा, घरकुलाचा लाभ देतांना कोणत्याही लाभार्थ्यास त्रास होणार नाही आणि त्यांना वेळेत हप्ते मिळतील याची खबरदारी घ्यावी.

जल जीवन मिशन अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना तत्परतेने नळ जोडणी नोदणी करण्याची यंत्रणांनी दक्षता घेण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. अमृत महा आवास अभियान २०२४-२५ अंतर्गत जिल्हा परिषद सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना तसेच सनद वाटप प्रसंगी ते बोलत होते.

राज्य महसूल विभाग तसेच राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत राज मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने स्वामीत्व योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेद्वारे गाव खेड्यावरील मिळकत धारकाला त्याचे मिळकतीचे मालमत्ता पत्रक उपलब्ध करून देण्यात येते त्यासोबतच संबंधित मिळकत धारकाला दस्तऐवजाचा हक्क देखील प्रदान करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर शनिवार दि१८ जानेवारी रोजी स्वामित्व उपक्रमांतर्गत आभासी मालमत्ता पत्रकाचे वितरण कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपाचा कार्यक्रम जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात शनिवारी घेण्यात आला.

यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.डी .लोखंडे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात देश पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे दूरदृष्टी प्रणाली द्वारे प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमात स्वामीत्व मालमत्ता पत्रक तसेच सनद वाटप पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील एकूण ५९ ग्रामपंचायत मध्ये स्वामित्व योजनेअंतर्गत शनिवारी एकाच वेळी ग्रामपंचायत ठिकाणी मालमत्ता पत्रक वाटप कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात जळगाव तालुक्यातील स्वरूपातील ५० ग्रामस्थ आमंत्रित करण्यात आले होते त्यात एकूण १७ ग्रामस्थांना उपस्थित आमच्या हस्ते सनद वाटप तसेच मालमत्ता पत्रकाचे वाटप करण्यात आले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकडे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी स्वामीत्व योजनेचा उद्देश व या योजनेची व्याप्ती याचे महत्त्व विशद केले. यावेळी महाआवास अभियाना संदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक आर.डी. लोखंडे यांनी पूरक माहिती दिली. सूत्रसंचालन विलास बोंडे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!