जळगाव | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त तसेच क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त म्हसावद येथे दि.११, गुरुवार रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन सकाळी ११:३० वाजता भोजनदानाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील असतील, तर आरपीआय जळगाव जिल्ह्याध्यक्ष राजू सूर्यवंशी, जि.प. सदस्य पप्पू सोनवणे, महाराष्ट्र जनक्रांति मोर्चा प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, पंचयात समिति सभापती मुकुंद नन्नवरे, जळगाव एमआयडीसी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, डॉ. मिलिंद बागुल, तसेच सत्कारमूर्ती म्हसावद गावाचे संरपंच गोविंदा पवार आणि डॉ. सत्यजीत साळवे यांची उपस्थिती असेल.
दि.१४ एप्रिल रविवार रोजी सकाळी ९ वाजता बुध्दविहारात सामुदायिक प्रार्थना होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयातही कार्यक्रम आयोजीत केला आहे. संध्याकाळी ५ वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणुक निघेल व रात्री १० वाजता म्हसावद रेल्वे स्टेशन येथे मिरवणुकीचा समारोप होईल. तरी कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान म्हसावद यांचेकडून करण्यात आले आहे.
