कजगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर – कजगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतात पहिली शाळा स्थापन करून आपल्या पुरोगामी विचाराची निर्भयपणे मांडणी करणारे स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कजगाव ग्रामपंचायत येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कजगाव ग्रामपंचायत सरपंच, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष भानुदास महाजन ग्रामपंचायत सदस्य व माळी समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व समाज बांधव तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
