Headlines
Home » क्रीडा » ६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघ मुलांमध्ये प्रथम तर मुलींमध्ये द्वितीय क्रमांक

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघ मुलांमध्ये प्रथम तर मुलींमध्ये द्वितीय क्रमांक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मध्यप्रदेश राज्य शासन व स्कूल शिक्षण विभाग देवास, मध्यप्रदेश आयोजित ६८ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपले वर्चस्व कायम राखत १९ वर्षे आतील मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर १९ वर्षे आतील मुलींमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

■ स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू :

◆ १९ वर्षे मुले :
१) ४५ किलो आतील गटात- दानिश तडवी (रौप्य पदक),
२) ४८ किलो आतील गटात- ओम बोरसे (सुवर्णपदक)
३) ५१ किलो आतील गटात- संस्कार अवताडे (रौप्य पदक)
४) ५५ किलो आतील गटात- आर्यन राऊत (रौप्य पदक)

◆ १९ वर्षे मुली :
१) ४६ किलो आतील गटात- तनिष्का काळे (सुवर्णपदक)
२) ५५ किलो आतील गटात- गौरी चिंदरकर (कांस्यपदक)
३) ५९ किलो आतील गटात- श्रद्धा वाल्हेकर (कांस्यपदक)
४) ६८ किलो आतील गटात- सिद्धी बेंडाळे (सुवर्णपदक)

सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ.अविनाश बारगजे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे ( क्रीडा मार्गदर्शक, छत्रपती पुरस्कार विजेते ) दुलीचंद मेश्राम, निरज बोरसे, महासचिव मिलिंद पठारे, सचिव सुभाष पाटील, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, सदस्य अजित घारगे, सतिष खेमसकर आदिनीं कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

सदर खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून ऋषिकेश खोमणे, नम्रता तायडे तर व्यवस्थापक म्हणून रविराज यादव यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!