कजगाव दि.९ ( प्रतिनिधी ) –दिपक अमृतकर | आज महाराणा प्रताप यांची जयंती कजगाव शहरात मोठ्या उत्साहात वाजत गाजत साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त संपूर्ण गावातून शोभायात्रा काढण्यात आली. ढोल पथक तसेच पारंपरिक पोशाखात फेटे बांधून महिला व मुली यात सहभागी झाले होते.


तसेच महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केलेले, आणि हनुमानाचे सोंग घेतलेल्या व्यक्तींनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
सर्वप्रथम महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजा व आरती करण्यात आली. संपूर्ण गावातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत तरुणांचा उत्साह गगनाला भिडणारा होता. राजपूत समाज बांधवांसोबत गावातील नागरिक देखील मिरवणुकीत उपस्थित होते. मिरवणुकीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
