Headlines
Home » जळगाव » मू.जे. महाविद्यालयाच्या सोहम योगतर्फे ध्यान साधना कार्यशाळा संपन्न

मू.जे. महाविद्यालयाच्या सोहम योगतर्फे ध्यान साधना कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीद्वारा गुरू पौर्णिमेनिमित्त सामूहिक ध्यान साधना कार्यशाळा आनंदयात्री योग हॉलमध्ये झाली. यात सोहम डिपार्टमेंटचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी मार्गदर्शन केले.

प्रारंभी महर्षी पतंजली, ओंकार आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. देवानंद सोनार यांनी योग साधकांकडून ओंकार साधना, गुरुवंदना आणि प्रार्थना करुन घेतली. तसेच पंचकोश ध्यान आणि त्यानंतर सद्गुरूंची मानसपूजा करण्यात आली. अखंड ओंकार साधना आणि शांतीपाठाने कार्यशाळेची सांगता झाली.

डॉ.परेश सनंसे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. हा दिवस गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे, असे विचार त्यांनी मांडले. यशस्वितेसाठी प्रा. पंकज खाजबागे, प्रा.श्रद्धा व्यास, शुभम पाटील तसेच एम.ए. योग आणि योगशिक्षक पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!