Home » महाराष्ट्र » लोकायुक्तांकडून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना कामकाजासंबंधीचा अहवाल सादर

लोकायुक्तांकडून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना कामकाजासंबंधीचा अहवाल सादर

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे लोक आयुक्त न्या.वि.मु. कानडे (नि.) व उप लोक आयुक्त संजय भाटिया यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपल्या कामकाजासंबंधीचा ५१ वा वार्षिक एकत्रित अहवाल सादर केला.

लोकायुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२३ या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे ४ हजार ७९० नवीन तक्रारी नोंदविण्यात आल्या. वर्षाच्या सुरुवातीला ४ हजार ५८३ प्रकरणे प्रलंबित होती. अशा प्रकारे सन २०२३ मध्ये ९ हजार ३७३ प्रकरणे कार्यवाहीकरिता उपलब्ध झाली.

नोंदणी केलेली ४ हजार ५५५ प्रकरणे अहवालाधीन वर्षात निकाली काढण्यात आली आणि सन २०२३ च्या वर्षअखेरीस ४ हजार ८१८ प्रकरणे प्रलंबित राहिली, असे लोकायुक्त कार्यालयाकडून यावेळी कळविण्यात आले.

महाराष्ट्रातील लोक आयुक्त संस्थेने गेल्या पाच दशकांमध्ये अनेक तक्रारदारांची गाऱ्हाणी दूर केली असून गेल्या काही वर्षात ७५ टक्के पेक्षा जास्त तक्रारींमधील तक्रारदारांच्या गाऱ्हाण्यांचे निवारण करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!