वास्तव पोस्ट l जळगाव : जिल्ह्यातील रावेर या मातीतून उगवलेले नाव म्हणजे राज गायकवाड. साधी परिस्थिती, जेमतेम घरची आर्थिक अवस्था… पण मन मात्र प्रचंड मोठं. सामाजिक चळवळीचा विधी तज्ञ आणि माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून त्यांनी लोकांच्या हक्कासाठी उभं राहण्याचा निर्धार केला आणि तो आजही तेवढ्याच ताकदीने पाळत आहेत.
गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्या उमेदवारीतून त्यांनी निवडणूक लढवली. विरोधकांच्या दबावतंत्राला न झुकता, पैशाच्या जोरावर उभ्या केलेल्या राजकारणाला न घाबरता ते मैदानात ठाम उभे राहिले. निकाल त्यांच्या बाजूने आला नाही, पण हा पराभव त्यांच्या विचारांचा नव्हता तर तो केवळ मतांचा होता. कारण लोकांच्या मनात राज गायकवाड आजही जिंकलेले आहेत.

राज गायकवाड म्हणजे गोरगरिबांचा आधार. शैक्षणिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करणारा, ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा ऐकून तत्काळ मदतीला धावून जाणारा एक संवेदनशील कार्यकर्ता.
सरकारी कार्यालयांत अडकलेल्या सर्वसामान्यांच्या फाईलला गती देण्यासाठी कायद्याची भाषा समजावून सांगणारा एक विधी तज्ञ. स्वतःची परिस्थिती साधी असताना देखील त्यांनी विधी शिक्षण घेतले. कारण त्यांना माहित होते – कायद्याचं ज्ञान हेच अन्यायाविरुद्धचं सर्वात मोठं शस्त्र आहे.
गोरगरीबांना न्याय मिळवून देणं, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद देणं — हीच त्यांची खरी लोकसेवा.
राज गायकवाड यांचा प्रवास संघर्षाचा आहे, पण त्यात कधीही हार मानण्याची छटा नाही. पराभवाने त्यांना थांबवलं नाही, उलट अधिक मजबूत केलं. कारण त्यांचा विश्वास आहे – “लोकसेवा ही पदावर अवलंबून नसते, ती मनातल्या प्रामाणिकपणावर उभी असते.” आज रावेर तालुक्यात जेव्हा कुणाला अन्याय होतो, तेव्हा एक नाव सहज उच्चारलं जातं – राज गायकवाड. कारण तो नेता नाही, तो कार्यकर्ता आहे. तो राजकारणी नाही, तो लोकांचा माणूस आहे. संघर्षातून घडलेला, न्यायासाठी पेटलेला आणि लोकसेवेसाठी समर्पित असा हा विधी तज्ञ – राज गायकवाड…रावेरच्या मातीचा खरा अभिमान !
वास्तव पोस्ट संपादक
दिपक जाधव – जळगाव

