जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात कातळ शिल्प या गुढ आणि रहस्यमय शिल्पा बद्दल राजापूरचे संशोधक आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए.के. मराठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये असलेल्या जांभ्या दगडाच्या कातळावर सुमारे दहा ते पंधरा हजार वर्षांपूर्वी माणसाने दगडी हत्यारांच्या सहाय्याने विविध प्राणी पक्षी मनुष्याकृती अशी असंख्य चित्रे कोरुन ठेवली आहे आतापर्यंत सुमारे दोनशे गावांमधून २५०० पेक्षा अधिक चित्रे सापडली आहेत. यातील ९ गावातील कातळ शिल्प साईट चा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या प्राथमिक यादीत झाल्यामुळे कातळशिल्प हा विषय जागतिक पातळीवर पोहचला आहे.
भारतीय पर्यटकांसोबतच अनेक परदेशी पर्यटक मुद्दाम कातळशिल्प पहायला येऊ लागल्याने कोकणातील पर्यटन वाढीला चालना मिळाली आहे, असे ए.के. मराठे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या प्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी सुषमा प्रधान यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कोळी यांनी केले कार्यक्रमासाठी निर्मल चतुर, पुनम कोल्हे यांचे सहकार्य लाभले.